संविधान साक्षरता परीक्षा बद्दल…

सगळ्यात आधी अनुभूती च्या सर्व टीम ला मला धन्यवाद द्यायचा आहे कारण संविधान साक्षरता परीक्षा या प्रोसेस मध्ये सहभाग घेण्याची संधी मला दिल्या बद्दल. आणि संविधान या विषयाला धरून अश्या प्रकारे जागरूकता तरुणांच्या मध्ये पसरविण्याचा उपक्रम चालू केल्या बद्दल सुद्धा..

१) सुपर्विझर म्हणून सहभाग घेत असताना :

  • या प्रोसेस चा भाग होऊन खूपच छान आणि खऱ्या अर्थाने काही तरी महत्त्वाचं काम करत आहोत अशी भावना आली.
  • As सुपर्विझर अनुभूती ने ज्या प्रकारे परीक्षा घेण्याची तयारी केली होती ती दिसून येत होती. माझ्या मते खूप छान प्रक्रिया होती जसे पेपर घेण्याचा आधीपासूनच प्लॅनिंग, वेगवेगळ्या कॉलेजेस मध्ये जाऊन परीक्षे बद्दल माहिती पुरविणे, त्याच बरोबर पेपर सेटिंग पासून ते मुलांना परीक्षेच्या तयारी साठी पुरविलेल्या काही गोष्टी आणि सोबत अनुभूती कडून मुलांना मिळालेलं प्रोत्साहन हे खूपच महत्वाचं होत.
  • Supervise करताना सगळच अगदी प्लॅनिंग ने केल्याचं मला अनुभवायला भेटलं जस मुलांना परीक्षेच्या वेळी लागणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं होत.
  • या परीक्षेबाबत मुलांच्या पेपर्स बद्दल खूप गोपनीयता ठेवण्यात आली होतीl जसे हॉल मध्ये आल्यावरच प्रश्न पत्रिका सिल एन्वेलोप मधून काढणे तसेच कोणत्याही मुलांचे नाव प्रश्न पत्रिकेवर कुठेही मेंशन न करणे इत्यादी…

२) युथ म्हणून या प्रक्रिये कडे बघण्याचा माझा दृष्टिकोन :

  • As youth म्हणून मला ही प्रोसेस खूपच महत्वाची वाटते आहेl
  • संविधान हा असा विषय आहे ज्या बद्दल बोललं जात की याच्या मुले आपला देश चालतो, या मुळे प्रत्येक नागरिकाला समान अधिकार मिळतो, प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हा कायदा आहे, संविधान हे भेदभाव विरोधात न्याय पूर्ण प्रक्रिया आहे, त्यात समानता आहे, तसेच या संविधान ला धरुनच आपल्या देशाची कायदेप्रणली चालते तर संविधानाचे महत्त्व आम्हा युथ ला असणे खूपच गरजेचे आहेl या पूर्वी मी अशा प्रकारची कोणती परीक्षा असू शकते किंवा आपण त्या मध्ये सहभागी घेऊ शकतो अशी कल्पना केली न्हवती.
  • ज्या प्रकारे कोणत्याही देशाचं भविष्य हा युथ असतो तर त्यांना या विषयाची माहिती असणे खूपच महत्वाचे आहे असे मला वाटते.
  • परीक्षेच्या माध्यमातून संविधान या महत्वाच्या विषयावर मुलांमध्ये जागरूकता निर्माण होईलl संविधान वाचन होईल, लिहीन होईल, चर्चा होईल, आणि आपोआप संविधानाची मूल्य समजून घेणं शक्य होईल. *मुलांच्या बोलण्यात संविधान हा विषय साहजिक येईल आणि मग संविधनावर awareness करणे सोपे होईलl कॉलेज जीवनातच संविधानाचे मूल्य समजून घेण्याची संधी जर युथ ला मिळाली तर त्यांची मूल्य स्वतःमध्ये रुजवायला सुरू होईल आणि या सगळ्यांचा चांगला परिणाम मुलांच्या सामाजिक जीवनावर सुद्धा होईलl न्याय अन्याय याच्या दृशिकोनातून समाजाकडे कस बघायचं हे मुलांना कळतं जाईल.
  • सामाजिक क्षेत्रात काम करत असताना संविधानाची मूल्य आताच्या वेळी मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहचली पाहिजे याची खूप गरज वाटते आहे ज्या प्रकारे आपल्या आजू बाजूचे वातावरण आहे त्याला धरून संविधानाची मूल्य सगळ्यांपर्यंत पोचवणे खूपच गरजेचे आहे असे वाटते आहे..

तर आपला देश, समाज संविधानावर चालतो आणि मग या देशाचे नागरिक असल्याने, या समाजाचा महत्वाचा भाग आपण असल्याने संविधानाच्या कायद्याचे पुरेपूर नॉलेज आपल्याला असायलाच हवं अस मला वाटतं.

– सोनाली शिर्के, एन.ए.पी.एम