singing-a-song-about-justice-during-the-residential-training

दोन दिवसीय कार्यशाळेत अनेक तरुण वर्ग सहभागी झाले होता. बहुतेक जण मजेसाठी, फिरण्यासाठी, पिकनिक या विचारानेच आले होते. पण कोणाला काहीच कळत नव्हत नेमकं काय शिकणार आहोत, काय विषय असणार आहेत.

आजचा तरुण वर्ग मोबाईल, इंटरनेट यामध्ये गुंतलेला आहेच पण या तरुण वर्गाला ते फायदेशीर तितकस घातक ही आहे. परंतु मोबाईल द्वारे (WhatsApp, Facebook) पसरण्यारा काही चुकीच्या तर काही शिकण्यासारख्या गोष्टीवर चर्चा झाली. एकूणच हा तरुण वर्ग एकत्र येवून या सगळ्यावर चर्चा करेल तेव्हाच हे प्रशन सुटतील याच प्रकारे ही चर्चा झाली.

एखाद संघटन तयार करण्यासाठी त्या संघटनेची ‘मूल्य’ काय असली पाहिजेत. त्या मूल्यावर चर्चा झाली पण ही सगळी मूल्य ठरवताना आपण संविधानाने दिलेल्या मूल्यापर्यंतच येवून थांबतो कोणतही मूल्य असो त्याची दोरी संविधानाकडेच येवुन संपत होती.

येथील व्यवस्थेनेने, समाजाने माणसामाणसात रुजवलेला वाद, समाजाने शोषित वर्गाला लावलेली लेबल्स जेव्हा आमच्याच काही तरुण-तरुणींच्या पाठीवर लावल्यावर, समाज म्हणून आम्ही दिलेला त्रास आणि त्यामुळे त्यांना होणारा ‘वेदना’ जेव्हा कळल्या तेव्हा प्रत्येकाचे डोळे भरून आले खरच आपण कुठेतरी चुकतो अस प्रत्येकाला वाटू लागलं. सफाई कामगार असो, समलिंगी असो, भंगी असो, तसेच लग्नाच्या अगोदर झालेली माता या सर्वांचेही काहीतरी प्रश्ण असतात हे तेव्हा कळलं.

आयुष्यात ‘स्त्री’ म्हणून जगत असताना त्या स्त्रीला होणारा वेदना रूढी परंपरेच्या जोखडामध्ये अडकलेला परिवार आणि त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार करत स्त्रीला दिलेली वागणूक एका चित्रपटाद्वारे तोच फरक जाणवला.

तसेच आयुष्यामध्ये माझी priority काय? हा प्रश्ण आला तेव्हा प्रत्येकाने अनेक वेगवेगळी कारण दिली प्रत्येकाच्या priorities वेगवेगळ्या होत्या कोणाचं शिक्षण, कोणाचं करिअर, कोणाचं घर, कोणाचं पैसे, मजा, परिवार तर कोणाचं माणूस बननं तर कोणाचं ‘मानवतावाद’. खरतर प्रत्येकाच्या एकसारख्या तर काहीच्या मजेशीर होत्या. प्रत्येकाच्या priorities वर चर्चा झाली, काही जणांना आपल्या priorities काय असायला हव्या हे तेव्हा कळालं. खरतर प्रायोरिटीज म्हणजे शिक्षण, पैसे, करिअर, कुटुंब होवु शकत नाही कारण या सर्व गोष्टी मिळाल्यानंतर काय? मुळातच प्रायोरिटीज म्हणजे आपण आपल्या आयुष्यात ठरवलेला महत्वाचा टप्पा आयुष्यात ठरवलेलं एक लक्ष, एक विचारधारा.

खरतर मला असं वाटतं शिक्षण, पैसा, करिअर हे माध्यम असु शकेल आपल्या प्रायॉरिटीज पर्यंत पोहोचण्याचं पण प्रायॉरिटीज नाही.

संस्थे मार्फत  दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजनाचे कारण तर एकुणच व्यवस्था परिवर्तन, माणसाने माणसाकडे पाहण्याचा दृष्टीकोन तसेच वास्तवात चाललेल्या घामोडी, राजकारण, जातीभेद, लिंगवाद, भाषावाद, प्रांतवाद… भ्रष्टाचार आणि त्यामुळे या सर्व गोष्टीत बळी पडलेला तरुण वर्ग या समस्यांना घेवून काय विचार करतो की नाही? स्वातंत्र्य, समता, बंधुता खऱ्या अर्थान रुजविण्यासाठी या तरुण वर्गाला पुढे यावं लागेल व मानवतावादी विचारधारा रुजवावी लागेल तर आणि तरच हा देश विकसनशील नव्हे तर विकसीत होईल असच काहीस कारण या कार्यशाळेचे असावे असं वाटतं.

-गौरव कांबळे (राही)