आपण साजरे करतोय स्वातंत्र्याची सत्तरी. पण खरंच स्वतंत्र झालोय का आपण? हीच वेळ आहे चिंतन करण्याची, पर्याय शोधण्याची, एकत्रित राहण्याची! फोडा आणि झोडा हे इंग्रजांनी जसे वापरले तसेच सत्ताधाऱ्यांनीही वापरलेच कि! कधी जातीच्या नावावर, कधी धर्माच्या, कधी प्रांताच्या, तर कधी भाषेच्या…यावादांचा आधार घेऊन जरी वादांमध्येस्त्रिया वेगळ्या विभागल्या गेल्या तरी मग पुरुषांपेक्षा त्याही कनिष्ठ ठरल्या आणि मग लिंगवादाच्या बळी पडल्या. हे सगळे वाद आज ना उद्या एकमेकांवर कुरघोडी करणारच. कमकुवत असणाऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणारच! मग ह्याला काय पर्याय आहे? खर तर उत्तर आपल्या समोर ठळकपणे उभे आहे म्हणूनच आपल्याला दिसत नाहीय. आम्हाला तरी एकच पर्याय दिसतोय तो म्हणजे संविधानवाद! हो! संविधानवाद!

काय आहे संविधानवाद म्हणजे? धर्माच्या, जातीच्या, प्रांताच्या, लिंगाच्या, आधारावर भेदभावामुळे जी हिंसा केली जाते किंवा कधी कधी नकळतपणे आपल्या हातून घडतेही; ती घडू नये म्हणून सजग होणे आणि ती रोखण्यासाठी स्वतःहून प्रयत्न करणे हि पहिली पायरी होईल. आणि मग या वादांना एक पर्याय शोधायला हवा ना;जो सर्वांना समानलेखतो, त्यांच्या अधिकारांची जोपासना करतो. हे तर आपल्याकडे आहेच! आपले मुलभूतअधिकार जिथे सुरक्षित आहेत त्या संविधानात! संविधानाचा अभ्यास करणे खरे तेर प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे; पण आपण ते करतोच असे नाही नाही ना, मग निदान संविधानातली मूल्ये तरी समजून घेऊयात का? म्हणून आपल्याला गरज आहे निदान संविधानाची उद्देशिका तरी वाचण्याची, समजून घेण्याची! अप्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे माणूस म्हणून जगण्याचा, सुरक्षिततेचा, संचाराचा, आत्मप्रतिष्ठेचा , पोटभर अन्न मिळण्याचा, अभव्यक्तीचा, आपले मत मांडण्याचा, प्रश्न विचारण्याचा इ. पण आजू बाजूला जे वातावरण आहे त्यात ह्या अधिकारांची पायमल्ली होतेय का? काही विशिष्ट गट मूलभूत अधिकारांपासून वंचित राहत आहेत का? मग त्यांना ते अधिकार मिळवून देणे हि जबाबदारी समाजातील इतर सर्व घटकांची हि आहे ना? मग त्यासाठी संविधान साक्षरता आणणे आणि लोकांपर्यंत पोचणे हि पहिली पायरी आहे. शालेय पाठयपुस्तकांमध्ये पहिल्या पानांवर हि संविधानाची उद्देशिका छापलेली असते. अगदी मूल्यशिक्षणाच्या पुस्तकातही कितीतरी मूल्ये शिकवली जातात; पण आपले मूलभूत अधिकारांची जाणीव करून देणाऱ्या उद्देशिकेचे शिक्षण, किमान वाचन ‘तेरी होते का? फार क्वचित वेळाच होते. भारत लोकशाही राष्ट्र आहे. इथे कुना राजाच्या हातात सत्ता नाही, नाही कोणा हुकूमशहाच्या हातात! ना कुणा जमीनदाराच्या, ना भांडवलदाराच्या हातात! ती आपणा सामान्य नागरिकांच्या हातात आहे. मग ती फक्त मतदान करण्याच्या क्षणापूर्तीच आहे का? तर नाही! ती कायमस्वरूपी आपल्याच हातात आहे मग आपण आपल्या सत्तेचा उपाययोग कमकुवत/वंचित गटांना मूलभूत अधिकार मिळवून देण्यासाठी करणे हि आपणा सर्वांची जबाबदारी आहे ना? या जाणिवेतूनच या campaign ची सुरुवात झालीय.

अनुभती च्या युवा गटाने ७०व्या स्वतंत्र्यदिनाच्या निमित्ताने या साक्षरीकरणाची सुरुवात केली आहे. सावसाधारण्पणे १५ ऑगस्ट ला हा युवा गट साधारणपणे ५०० च्या आसपास लोकांना भेटला व त्यांच्या समोर संविधानवादी  होण्याची  संकल्पना मांडली. लोकांसमोर सामाजिक जाणिवतेची गाणी गाईली, आणि लोकांनी; अगदी ४ वर्षाच्या बालकांपासून ते ८० वर्षांच्या वृद्धां पर्यंत सर्वांनी स्वयंस्फूर्तीने मी संविधानवादी आहे असे अभिमानाने म्हंटले व आपण हि सर्व मूल्य जोपासू अशी सामूहिक प्रतिज्ञा करून उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नेतृत्व अनुभूती च्या युवा गटाने यशस्वीपणे केले. आम्हाला असा अनुभव आला कि हा नवीन पर्याय खूप भावतोय. शांतपणे, आनंदाने जगणे सर्वानाच आवडते ना. काही लोकांना पहिल्यांदा थोडा त्रास हि झाला; कि समता बंधुता अवलंबायची म्हणजे कसे काय होणार? पण त्यांनीही उस्फुर्त प्रतिसाद दिला नंतर; मग उस्फुर्तपणे लोकांनीच आम्हाला एका ठिकाणहून दुसऱ्याठिकाणी, दुसर्याहून तिसऱ्याठिकाणी असे नेले आणि आमच्या इथे या आणि तुमचा कार्यक्रम करा असे सांगितले. कितीतरी युवांनी आम्हाला पण जोडून घ्या असे सांगितले.

लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला, पण सगळ्यात जास्त लक्षात राहिला तो एका ८०वर्षांच्या काकांचे उस्फुर्त भाषण! ते गांधीवादी आहेत. राजकारण, सामाजिक संस्था, यांबद्दल त्यांचे खूप नकारात्मक मते आहेत. ८० वर्षांचा जीवनानुभव आहे त्यांचा; त्यांनी मात्र संविधानवादी या संकल्पनेला आणि युवा वर्गाला यात सामावून घेण्याच्या संकलनेचे तोंड भरून कौतुक केले; आणि अभिनंदनही! आणि आम्हाला सर्वतोपरी सहायय करण्याची तयारीही दर्शवली.

या सर्व अनुभवांवरून या संकल्पनेचे महत्व अधोरेखित होतेच,पण योग्य पर्याय उपलब्ध करून दिला,आणि प्रामाणिक प्रयत्न केले तर सर्वसामान्य माणसांचा पाठिंबा,उस्फुर्त प्रतिसाद एका सामाजिक बदलाकडे लौकरच घेऊन जाईल अशी आशा आहे.

– तिलोत्तमा